गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा बंदीविरोधात AIMIM चे
आंदोलन व उपोषण
मुंबई(कटूसत्य वृत्त):- गोरेगाव येथील विवेक कॉलेजमध्ये बुरखा वापरण्यावर करण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ आज AIMIM मुंबईचे अध्यक्ष जनाब हाजी फारूक भाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कॉलेज प्रशासनाने लादलेल्या बुरखा बंदीस विरोध म्हणून भूक हडताल देखील सुरू करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, हा मुद्दा केवळ एका लिबासाचा नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या पहनण्याच्या स्वातंत्र्याचा, वैयक्तिक अधिकारांचा आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्काचा आहे.
हाजी फारूक भाई शाब्दी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,“भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्याचे आणि आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य देते. बुरखा बंदी हा त्या मूलभूत हक्कांवर अन्यायकारक घाला आहे. आम्ही हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करतो.”
आंदोलनकर्त्यांनी कॉलेज प्रशासन आणि शासनाला विनंती केली की असे निर्णय सामाजिक तणाव वाढवू नयेत म्हणून तातडीने पुनर्विचार करण्यात यावा. विद्यार्थी आणि पालक वर्गानेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून प्रशासनाने संवाद साधून मार्ग काढावा अशी मागणी केली.
AIMIM च्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.


0 Comments