सुधीर खरटमल यांच्यावर निवडणूक नियोजन आणि प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरटमल यांच्या निवडीचे पत्र बुधवारी काढले आहे. या निवडीबद्धल राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून या निवडीचे स्वागत केले
सुधीर खरटमल ज्येष्ठ नेते असून त्यांना सोलापुरातील राजकारणाचा ३० ते ४० वर्षाचा अनुभव आहे. विविध राजकीय पक्षाचे त्यांचे चांगले संबंध आहेत. सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीचा त्यांना प्रभागनिहाय अनुभव आहे. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे असे मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आपली निवड सार्थ ठरविण्याबरोबरच सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू असा विश्वास सुधीर खरटमल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला .
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक अध्यक्ष सुहास कदम, विवेक खरटमल , प्रवीण गाडेकर ,अर्चना दुलंगे, चंद्रकांत शेरखाने, प्रा. बोळकोटे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे उपस्थित होते.

0 Comments