Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांना मिळणारशिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत खात्यावर जमा होणार पैसे

 विद्यार्थ्यांना मिळणारशिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत खात्यावर जमा होणार पैसे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत. सन २०२३-२४ मध्ये अर्ज सादर केलेल्या २६ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडे निधी प्राप्त झाले आहे. त्या निधीतून येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत.


जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून पाचवी ते सातवी, आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या

मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान करणे, नववी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती अशा योजना राबविण्यात येत आहेत.


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून

सातत्याने जनजागृती, प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.


दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून विवि प्रकारच्या शिष्यवृत्ती योजन राबविल्या जात आहेत. सन २०२४ २५ सालासाठी अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे. मुदत शेवटच्या टप्प्या आहे. जास्तीत जास्त अर्ज भरण्यासाठ जिल्हा परिषदेने मुख्याध्यापकांन सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांन

तातडीने अर्ज करावे, असे आवाह समाजकल्याण विभागाने केले आहे.


चौकट 

आतापर्यंत १२ हजार अर्ज

सन २०२४- २५ शिष्यवृत्ती योजनेसाठी आतापर्यंत १२ हजार ५९ अर्ज दाखल झाले आहेत. पूर्व जिल्हा परिषदेकडून ११ शिष्यवर्त्ती योजना राबविण्यात येत होत्या. मात्र काही योजना इतर विभागाकडे वर्ग झाल्याने सध्या सहा योजना समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहेत.

• सन २०२३ २४ मधील प्राप्त अर्ज २६ हजार ३५३

• सन २०२४-२५ मधील प्राप्त अर्ज १२०५९

शासनाकडून प्राप्त निधी ३ कोटी २२ लाख ८९ हजार रुपये

Reactions

Post a Comment

0 Comments