Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वेरीत 'इनोव्हेशन डे' आणि 'आयट्रिपलई डे' साजरा

 स्वेरीत 'इनोव्हेशन डे' आणि 'आयट्रिपलई डे' साजरा



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग या विभागाच्यावतीने संस्थेचा 'नवोन्मेष दिन' (इनोव्हेशन डे) आणि 'आयट्रीपल ई डे' हे दोन्ही उपक्रम संयुक्तपणे साजरे करण्यात आले.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘भारताचे क्षेपणास्त्र पुरुष' डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये 'नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकते' विषयी प्रेरणा निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इव्हॉल्विंग एक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अमोल नितवे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमोल नितवे यांनी 'नवोन्मेषी विचारसरणी, स्टार्टअप संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वास्तवातील समस्यांचे समाधान' या विषयांवर मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी सर्व आयट्रीपलाई संबंधित उपक्रमांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. स्मिता गावडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता तळवळकर, स्वरा तासगांवकर आणि समृद्धी मोरे यांनी केले, तर आभार डॉ. दिग्विजय रोंगे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments