श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन उत्कृष्ट :- अण्णा शिंदे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून नावलौकिक मिळवत असून, देवस्थानचे व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णा शिंदे यांनी केले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, सर्व विश्वस्त व पदाधिकारी भाविकांची अत्यंत विनम्रपणे सेवा करत असून, स्वामी दर्शनापासून विविध धार्मिक उपक्रमांपर्यंत तसेच गर्दीच्या वेळी वयोवृद्ध व दिव्यांग स्वामी भक्तांसाठी तात्काळ दर्शनाची व्यवस्था, भाविकांना आवश्यक ती मदत आदी सुविधांमुळे देवस्थान व्यवस्थापनाचे वेगळेपण अधोरेखित होत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
अण्णा शिंदे यांनी नुकतेच सपत्नीक तसेच मित्रपरिवारातील उद्योजक भाऊसाहेब पडवळ, ईश्वर चोरगे व त्यांच्या कुटुंबीयांसह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी अण्णा शिंदे व त्यांच्या कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन सन्मान केला.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, बाळासाहेब एकबोटे, गुरव समाजाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे सदस्य संतोष जाधव-फुटाणे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह गुरव समाजाचे अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments