Hot Posts

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी नियमित शुल्कासह 8 डिसेंबरपर्यंत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. विलंब शुल्कासह 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 23 डिसेंबर तर अति विशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही माहिती भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.  

Reactions

Post a Comment

0 Comments