अकलूजच्या भाजी मंडईत आढळल्या नकली नोटा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील बाजी मंडईत नकली नोटांचा संचार वाढू लागला असून,गोरगरीब फळ भाजी विक्री करणाऱ्यांना या नकली नोटांचा फटका बसत आहे.
अकलूजच्या भाजी मंडईत दररोज खेड्या पाड्यातील गोरगरीब शेतकरी, व्यापारी शेतातील भाजी विकण्यासाठी येत असतात.भाजी विकत घेणारे काही लोक, भाजी विकत घेवून नकली नोटा देत असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे अकलूजच्या बाजारपेठेत बनावट नोटांचा प्रसार होवू लागला आहे. विशेष म्हणजे काही सुशिक्षित लोक बनावट चलनाचा वापर करीत आहेत.त्यामुळे भाजी मंडईतील शेतकरी महिलांची दिवसा ढवळ्या फसवणूक होत आहे.
अकलूजच्या महात्मा ज्योतीबा फुले भाजी मंडईत, बनावट नोटांचा वापर होवू लागल्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.भाजी मंडईत काही जोडपे मंडई खरेदी करत फिरत होते.जिथे भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी जास्त झालेली असते तीथे ते जातात, भाजी घेतात व गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा देवून निघून जातात.या प्रकारामुळे भाजी विकणा-या महिला त्रस्त झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात २५/४ लवंग येथील भेळ भत्ता विक्रते बापू जाधव यांना, एका सुशिक्षित महिलाने चार चाकी वाहनातून येवून, त्यांच्या दुकानाततून ५० रूपयाचा भत्ता घेवून, बनावट ५०० रूपयाची नोट देवून बाकी पैसे घेवून निघून गेली.यामुळे बनावट नोटाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे.अकलूज पोलीस यांनी याकडे विशेष लक्ष केंद्रित करून,नकली नोटा देऊ करणाऱ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे असे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.

0 Comments