Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम : प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला

 महापालिका निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम : प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. पूर्वी १४ नोव्हेंबरला जाहीर होणारी प्रारूप मतदार यादी आता २० नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. या प्रारूप यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवता येतील.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभा मतदार यादीच्या आधारे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून त्याच दिवसापासून हरकती स्वीकारल्या जातील.


प्राप्त हरकतींची छाननी करून ५ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम यादी मतदान केंद्रांवर प्रसिध्द करण्याची तारीख ८ डिसेंबर, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.


या सुधारित कार्यक्रमानुसार सर्व महापालिका प्रशासनांनी पुढील कार्यवाही सुरू केली असून निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला वेग आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments