जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे; आरपीआय (आठवले) ची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे; आरपीआय (आठवले) ची मागणी

 जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे; 

आरपीआय (आठवले) ची मागणी

संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील व मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे – आरपीआय (आठवले) दिव्यांग आघाडीची बीड पोलिस अधीक्षकांकडे मागणी


बीड (वृत्तसेवा) :- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात अग्रस्थानी राहून अहोरात्र जनतेसाठी कार्यरत असलेल्या संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील व मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दिव्यांग आघाडी तर्फे बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

ही मागणी आरपीआय (आठवले) दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांनी पक्षाच्यावतीने निवेदनाद्वारे केली. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही नेते दीर्घकाळापासून आंदोलनाच्या माध्यमातून समाजासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवून त्वरित संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सुरेश माने यांनी सांगितले की, “मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढा दिला आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि लोकहितवादी भूमिकेमुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभले आहे. त्यामुळे काही असामाजिक घटकांकडून त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पोलीस संरक्षण देणे अत्यावश्यक आहे.”

त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या चळवळीत सक्रीय असलेले गंगाधर नाना काळकुटे पाटील हेही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाचे भान ठेवून त्यांनाही सुरक्षा कवच मिळावे, अशीही मागणी करण्यात आली.

या निवेदनावर दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.सुरेश माने यांनी पुढे सांगितले की, “मराठा समाजाचा लढा हा हक्काचा लढा आहे. या लढ्यात सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नेत्याची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. सरकारने तत्काळ पावले उचलून समाजातील तणाव टाळावा.”

या प्रसंगी आरपीआय (आठवले) चे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages