Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर–कोल्हापूर (हायकोर्ट) बससेवेचा शुभारंभ; सोलापूरकरांची मागणी पूर्ण

 सोलापूर–कोल्हापूर (हायकोर्ट) बससेवेचा शुभारंभ; सोलापूरकरांची मागणी पूर्ण



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांची दीर्घकाळची अपेक्षा पूर्ण करत आज दि. २२ नोव्हेंबर पासून सोलापूर–कोल्हापूर (हायकोर्ट) अशी स्वतंत्र व थेट बससेवा सुरू करण्यात आली. कोल्हापूर येथे हायकोर्टचा बेंच सुरू झाल्यानंतर सकाळी लवकर कोल्हापूर गाठण्यासाठी थेट बसची मागणी वाढली होती. नागरिकांच्या या मागणीला प्रतिसाद देत एसटी प्रशासनाने आजपासून ही सुविधा उपलब्ध करून दिली.

मार्ग व वेळापत्रक

ही बस सोलापूर–मंगळवेढा–सांगोला–मिरज मार्गे थेट कोल्हापूर येथे पोहोचेल. विशेष म्हणजे, कोल्हापूर मुख्य बसस्थानकातून ही बस *थेट टाऊन हॉल (हायकोर्ट)*पर्यंत प्रवाशांना घेऊन जाईल. कोल्हापूरहून परतीच्या प्रवासातही हीच सुविधा उपलब्ध राहणार आहे.

* सोलापूर येथून सकाळी ०६.०० वाजता सुटका टाऊन हॉल, कोल्हापूर येथे आगमन – ११.१५ वाजता

* टाऊन हॉल, कोल्हापूरहून संध्याकाळी ०६.०० वाजता सुटका सोलापूरकडे परतीचा प्रवास

उद्घाटन सोहळा

सकाळी ०६.०० वाजता विधिवत पूजन करून बस मार्गस्थ करण्यात आली. या प्रसंगी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजूटगी, तसेच सोलापूर आगारातील सर्व चालक–वाहक उपस्थित होते.

नवीन बससेवा सुरू झाल्याने हायकोर्टाशी संबंधित वकिलांना, याचिकाकर्त्यांना, विद्यार्थ्यांना तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments