Hot Posts

6/recent/ticker-posts

खो-24 वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वरला दुहेरी मुकुट

खो-24 वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वरला दुहेरी मुकुट


जिल्हा अजिंक्यपद कुमार व मुली खो-खो स्पर्धा ः किरण स्पोर्टस्‌‍ व वाडीकुरोली उपविजेते

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  
वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने जिल्हा अजिंक्यपद कुमार व मुली गटातून विजेतपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला.
जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वेळापूरच्या  मुलींनी के. के. स्पोर्टस क्लब वाडीकुरोलीचा 12-11 असा एका गुण व 10 सेंकंद राखून पराभव केला.  मध्यंतराच्या 4-6 ही पिछाडीच वाडीकुरोलीस महागात पडली. मुलांच्या संघाने येथील किरण स्पोर्टस क्लबला 22-10 असे 12 गुणांनी हरविले. मध्यंतरासच त्यांनी 11-6 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. तृतीय स्थान शेवतेच्या आदर्श क्लब व मुलींच्या गटात समृद्धी स्पोर्टस्‌‍ क्लबने संपादिले.
 
स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सहसचिव राजाराम शितोळे,  पंच मंडळ सचिव गोकूळ कांबळे, तांत्रिक समितीचे सचिव शिवशंकर राठोड, निवड समिती सदस्य गुलाम मुजावर, मोहन रजपूत, सतीश कदम, प्राची बुह्राणपूर, असोसिएशनचे सदस्य सुरेश खुर्द भोसले,  शरद व्हनकडे, सोनाली केत,  संतोष कदम, अजित शिंदे, जावेद मुलानी, सोमनाथ बनसोडे, पुंडलिक कलखांबकर आदी उपस्थित होते.

पंच म्हणून नागेश माडीकर, यंकाप्पा शेंडगे, लखन कांबळे, नौशाद मुजावर, सुरज शेवाळे, रवींद्र चव्हाण, आनंद जगताप, अशोक कोळी, समर्थ कोळी, अनिकेत सावंत, शेखर जोडमोटे, जगन्नाथ जाधव, समीर शेख, अक्षय पवार, श्रीकांत चव्हाण यांनी काम पहिले.
Reactions

Post a Comment

0 Comments