शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण घेऊन सरताज शेख(सय्यद) यांची प्रभाग नऊ मध्ये होणार एन्ट्री
आमदार राजू खरे यांचे निकटवर्तीय समर्थक सर्फराज सय्यद यांच्या जनसंपर्काचा मोठा फायदा होणार
मोहोळ (साहिल शेख):- राष्ट्रवादी आणि शिवसेना असाच यापूर्वी संयुक्त बालेकिल्ला असलेल्या प्रभाग नऊ मध्ये शिवसेना शिंदे गट दमदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागातून सरताज सलीम शेख (सय्यद) हे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. सरताज सय्यद हे धनुष्यबाण चिन्हावर या निवडणुकीत अन्य उमेदवारांना आव्हान देणार आहेत. सरताज शेख ह्या उच्चशिक्षित असून या शिक्षणाचा प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी फायदा होईल. मोहोळ शहरातील सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेले सर्फराज तथा लड्डू सय्यद यांच्या सुविद्य पत्नी आहेत सय्यद परिवार हा गेल्या दीड दशकापासून मोहोळ शहराच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये सातत्याने सहभागी होऊन जनसामान्यांची सेवा करत आला आहे. सर्फराज सय्यद हे आमदार राजू खरे यांचे निकटवर्तीय समर्थक असून त्यांच्याच नेतृत्वाखाली हे या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी प्रभागातील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. शिवाय हे याच प्रभागातील स्थानिक रहिवासी असल्यामुळे स्थानिक उमेदवारीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर ते या प्रभागातील निवडणुकीचे रान चांगलेच तापवत आहेत. त्यामुळे सरफराज सय्यद यांची उमेदवारी या प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाब ठरत असून त्यांना निश्चितपणे निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळेल अशी सरफराज सय्यद यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे.
चौकट
आमदार राजू खरे हे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून संपर्क ठेवून होते. गेल्या पाच वर्षापासून सर्फराज सय्यद हे आमदार राजू खरे यांच्या संपर्कातील विश्वासू समर्थक आणि मनमिळाऊ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. अत्यंत आव्हानात्मक काळात आमदार राजू खरे यांच्या सोबत असलेले सर्फराज सय्यद यांच्या उमेदवारीच्या रूपाने त्यांना नक्कीच या निष्ठेची पोचपावती मिळेल असा विश्वास या प्रभागातील त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. या प्रभागातील स्थानिक रहिवासी असण्याबरोबर त्यांचा या प्रभागात स्नेह परिवार आणि मित्रपरिवार मोठा आहे. त्यांचाही मोठा पाठिंबा यांना मिळाल्यास ते या प्रभागाचे कार्यकुशल आणि दक्ष नगरसेवक म्हणून जोरदार एन्ट्री करतील यातील मात्र शंका नाही.
.jpg)

0 Comments