Hot Posts

6/recent/ticker-posts

पशुधन बचाव मोहीम उपक्रम समाजाला आदर्श- कुलदीप जंगम

 पशुधन बचाव मोहीम उपक्रम समाजाला आदर्श- कुलदीप जंगम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निसर्गातील प्रत्येक चरा चरा मध्ये ईश्वराचा अंश असतो याची जाणीव ठेवून जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पशुधन बचाव मोहीमे अंतर्गत पूरग्रस्त मुक्या जनावरांना पशुखाद्य वाटपाचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधीकारी कुलदीप जंगम यांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्यां वतीने ७ टन पशुखाद्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात काढले
               सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिवानंद भरले यांच्या कल्पनेतून सुचलेल्या पशुधन बचाव मोहीम अंतर्गत सिना नदीच्या महा पुराने बाधीत झालेल्या गावातील *मुक्या जनावरांना पशुखाद्य सेवानिवृत्त शिक्षकांनी गोळा केलेल्या २,६०,,००० रकमेतून ७ टन पशुखाद्य खरेदी केली होती त्याचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकर्याना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधीकारी दालना समोर वाटप करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख पशुधन अधीकारी विशाल येवले उपस्थित होते
         पूरग्रस्त माणसानां पाहिजे तेवढे अन्नधान्य पुरवठा होत आहे परंतु पशुधनाचे वैरण पाण्याखाली गेल्याने मुक्या जनावर दावनी वर उपाशीपोटी राहत असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम स्तुत्य आहे असे जंगम यांनी म्हणाले यासाठी सुभाष फुलारी ंसिध्देश्वर धराडे, रमेश गायकवाड,, शंकरराव सावंत, कुंदा राजगुरू, काळप्पा सुतार, मल्लिकार्जुन बडदाळ सिद्राम जिरगे चन्नमलप्पा चिट्टे भिमाशंकर म्हेत्रे, बादशहा मुल्ला शिवाजी पाटील, वीरभद्र यादवाड, संजय देवकाते किर्ती गुरव, वसंत दिघे विलास गिराम बशीर ताबोंळी, सुरेश गुरव, शब्बीर अन्सारी,दिनकर घोडके, शंकरराव जाधव, नितीन कुलकर्णी, भरतेश्वर रत्नपारखी सिद्राम शेगाव, पुजारी काळे, आदींनी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकाच्यां मदतीने राबविले.
Reactions

Post a Comment

0 Comments