Hot Posts

6/recent/ticker-posts

प्राथमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश वाटप

 प्राथमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश वाटप





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खाजगी अंशत: अनूदानित प्राथमिक शाळांची  वाढीव अनुदानाची प्रक्रीया पारदर्शकपणे राबविण्यात आली.सबंधित शाळांना ई मेल द्वारे आदेश प्राप्त झाले.त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार यांचा सत्कार केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख  राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
    २५ आॅगस्ट २०२५ च्या शासन अदेशानुसार अंशत: अनुदानित प्राथमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदान जाहिर करण्यात आले.जिल्ह्यातील ६२ शाळा वाढीव टप्पा अनुदानासाठी व १० शाळा नव्याने टप्पा अनुदानासाठी पात्र  झाल्या.शाळांची कागदपत्रे तपासणे व अनुदान आदेशाचे वाटप करण्याची प्रक्रीया पारदर्शकपणे राबवुन अनुदानाचे आदेश ई मेल द्वारे देण्यात आले. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचेही सहकार्य लाभले.डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.यावेळी सुनिल चव्हाण,आप्पाराव इटेकर,सोमेश्वर याबाजी,अ.गफुर अरब,वल्लभ चौगुले व सचिन चौधरी आदी उपस्थित होते.शिक्षणाधिकार्‍यांना त्यांचे स्केच देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमेश्वर याबाजी यांनी तर अतुल नारकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बरगली लांडगे, वैभव कुंभार,शिवानंद हलसंगी,माजिद कलादगी,अंकुश घोडके,यांनी प्रयत्न केले.

Reactions

Post a Comment

0 Comments