Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने लढणार- संतोष पवार

 महापालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने लढणार- संतोष पवार




पुणे (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती.
  या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती , महानगरपालिकेतील सदस्य संख्या, तसेच मागील निवडणुकी मधील महानगरपालिकेमधील सर्व पक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन  पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले.
  या बैठकी प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील  विविध  ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्या बदल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात व व अन्य बाबींच्या चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.
     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्क मंत्री दत्तात्रय  मामा भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या ताकतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष  पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments