Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी व आत्महत्याग्रस्त कुटुंबास ३१,००० रुपयांची आर्थिक मदत

 अतिवृष्टी व आत्महत्याग्रस्त कुटुंबास ३१,००० रुपयांची आर्थिक मदत




बार्शी (कटूसत्य वृत्त):- उडान फाउंडेशनच्या वतीने मोहम्मद पैगंबर कर्तव्य निधी अंतर्गत अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबास रोख स्वरूपात ₹३१,०००/- आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. या मदतीचा उद्देश अशा संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक व आर्थिक आधार देणे हा आहे.
या मदत वितरण प्रसंगी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, सचिव जमील खान, सल्लागार युन्नूस शेख, कार्याध्यक्ष शकील मुलानी, तसेच जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के, साजन शेख, गणेश गोडसे, ऍड. रियाज शेख, वसीम पठाण, मोहसीन पठाण, सादिक काझी, शोहेब काझी, शहाबाज मुलानी, पांगरीचे माजी सरपंच विलास लाडे, वैरागचे नगरसेवक वैजिनाथ आदमाने, रियाज बागवान, वसीम मुलाणी, शोहेब सय्यद, रॉनी सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत उडान फाउंडेशनने गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments