आम्ही आदिवासीच.. जुनर बंजारा समाजाचा तहसीलदार यांना निवेदन
पुणे (कटूसत्य वृत्त):- जिल्हातील जुनर तालुक्यातील बंजारा समाजाने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, हैदराबाद गॅझेटीअर व सेंट्रल प्रोविन्स अँड बेरार गॅजेट (नागपूर, म.प्र.) तसेच १९५६ च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी निवेदन बंजारा समाज जुनर तालुक्यात एकवटला.
या निवेदनामध्ये हैदराबाद गॅझेटियर संदर्भानुसार बंजारा समाजाला तत्काळ संविधानातील अनुच्छेद १४ व २१ प्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. मुळात बंजारा समाज हा आदिवासीच आहे. सरकारने लक्ष देऊन या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी, या निवेदनातून जुनर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेचे सदस्य संजय चव्हाण, गणेश नगर तांडा चे कारभारी काशिनाथ पवार, प्रदीप पवार, अंकुश राठोड, सुनिल चव्हाण आदी आदिवासी बांजरा बांधव उपस्थित होते.
0 Comments