विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अचानक अंतरवालीत, बंद दाराआड चर्चा
अंतरवली (कटूसत्य वृत्त):- राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे, मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण देण्यात येऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. ओबीसी समाजाकडून या आरक्षणाला विरोध होत आहे.
काही दिवसांपूर्वीच ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, मंत्री पकंजा मुंडे यांच्यासह प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहाला मिळालं. तर दुसरीकडे सरकारने काढलेला जीआर शासनाने रद्द करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती, तर पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत वाटण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी असं म्हटलं होतं.
दरम्यान त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे, मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवालीमध्ये जाऊन आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली, ही भेट नेमकी कशासाठी आहे? याच कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र सध्या ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाला प्रचंड विरोध होत आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
0 Comments