तिवाडी यांच्या 'अन्नपूर्णा ' परिवारा तर्फे भाकरी आणि फराळाचे वाटप - नंदकिशोर तिवाडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील सुप्रसिद्ध अशा मिठाई क्षेत्रातील तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई व नमकीन तर्फे मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक, खुनेश्वर, सावळेश्वर, आष्टी या गावातील गरजूंना भाकरी आणि फराळाचे वाटप करण्यात आले असल्याचे तिवडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन व बेकरी परिवाराचे प्रमुख नंदकिशोर तिवाडी यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नंदकिशोर तिवडी परिवाराच्या वतीने आपले कर्तव्य समजून गरजू लोकांना 5 भाकरीचे पाचशे पॉकेट्स, 500 शेंगा चटणी पॉकेट्स, 500 मिरची ठेचा पाकिटे , 500 पाण्याच्या बाटल्या, 500 उपवासाचे साबुदाणा चिवडा पाकिटे असे मोहोळ तालुक्यातील वरील गावात वाटप करण्यात आले आहे. या वेळी डॉ. श्वेता, पायल तिवाडी उपस्थित होते.
अशा अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे माणसाने माणसाला मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अशा वेळी मदत करून आपण गरजू लोकांचे मनोधैर्य वाढवू शकतो. त्यामुळे त्यांना जगण्याची नवीन आशा निर्माण होईल. माझ्या परीने मी मदतीचा खारीचा वाटा उचललेला आहे. याचा मला आनंद आहे. असे मत नंदकिशोर तिवाडी यांनी व्यक्त केले.
0 Comments