Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग सहा मधून निवडणूक लढवण्याचा शरयू आनंद गावडे यांचा निर्धार

 प्रभाग सहा मधून निवडणूक लढवण्याचा शरयू आनंद गावडे यांचा निर्धार




सामाजिक बांधिलकी बरोबर प्रभागातील जनसंपर्काचा होणार मोठा फायदा

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूणच मोहोळ शहरातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघताना दिसत आहे. मोहोळ शहरातील काही प्रभाग हे राजकीय दृष्ट्या आपली अस्मिता आणि राजकीय समीकरणांची पूर्व वैशिष्ट्ये टिकवून आहेत. अशाच प्रभागापैकी एक असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शरयू आनंद गावडे या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इच्छुक असून त्यांनी निवडणुकीच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत झाल्यापासूनच निवडणूक लढविण्याच्या पूर्वतयारीला जोरदार प्रारंभ केला आहे. यापूर्वी या प्रभागातील जुन्या म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मधून अतुल गावडे या गावडे परिवारातील कौटुंबिक सदस्यांनी नगरसेवक पद भूषवले आहे. शरयू आनंद गावडे या मोहोळ शहरातील मूलभूत सुविधा आणि समस्यांचा गाढा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आनंद गावडे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. तर मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये विविध पदे भूषवत आपले राजकारणातील वेगळेपण जपणारे ज्येष्ठ नेते रामचंद्र तथा रामभाऊ दाजी खांडेकर यांच्या सुकन्या आहेत. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरपर्सन असून इतरही महिलाविषयक सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो याशिवाय मोहोळ शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन महिलांना मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून भव्य हळदी कुंकू कार्यक्रम त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो. इतरही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याबरोबर प्रत्येकाला सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

चौकट
गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांचे दीर अतुल गावडे हे नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. प्रभागातील सामाजिक सलोखा जपण्याबरोबर संयमी कार्यशैलीच्या गावडे परिवाराने सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि बंधू-भगिनींचे मन आणि मत जपत राजकीय वाटचाल सुरू ठेवले आहे. पक्ष स्तरावरून अपेक्षित निधी मिळाला नसतानाही स्वखर्चातून अनेक  कामे पुर्ण करण्याबरोबर कोविड कालावधीमध्ये फवारणी व धान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुष्काळी पाणीटंचाईच्या कालावधीत स्वखर्चातून ट्रॅक्टर आणि टँकर खरेदी करत प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments