चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 1.51 लाखांची मदत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयाची मदत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांना चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी व समाज अध्यक्ष नागनाथ कोंतम यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्हा. चेअरमन विलास बडगंची व समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
पूरग्रस्तातील गरजू लोकांना तातडीने मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे यात आपला खारीचा वाटा असावा म्हणून चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्थेने एक लाख 51 हजार रुपयांचा निधी देऊन खारीचा वाटा उचलत असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांनी सांगितले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांनी म्हणाले की जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले सोलापूर आणि महाराष्ट्रावर तेव्हा पतपेढीच्या माध्यमातून आमचा समाज मदत करीत आले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यात पतसंस्थेचे नाव असून पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद असल्याचे किरण गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येक आपत्तीत चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था नेहमी सहकार्य करीत असून असेच अनमोल सहकार्य करीत रहा त्यामुळे प्रगतीपथावर राहील तुमची पतसंस्था असे कौतुक उदगार गायकवाड यांनी काढले. यावेळी सर्व संचालक अरुण चिंता, विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, नरेंद्र बत्तुल, मल्लिकार्जुन खंडे, विष्णू म्याकल, शंकर कोंतम, अजय रंगम, चंद्रकांत रंगम, सौ उमा पुडूर, अंबिका उदगिरी विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड भगवंत फलमारे, अंबादास कंदीकोंडा, माजी संचालक श्रीधर चिंता आदी उपस्थित होते
0 Comments