सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ.
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्था नातेपुते संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते येथे प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख सहशिक्षक सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ संस्था पदाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . गोरे सर 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा कवितके सचिव दिलीप घुगरदरे प्रशाला समिती सभापती हनुमंत धालपे संचालक महेश ठोंबरे अतुल बावकर अभिजीत घुगरदरे अँड. भारत उराडे हे मान्यवर उपस्थित होते. मनोगतात गोरे सर यांचा गुणगौरव करताना शांत संयमी स्वभावाचे गोरे सर यांनी समर्पित भावनेने काम केले. आपली शाळा सर्वार्थाने मोठी व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. क्रीडा क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला. विद्यार्थी केंद्र बिंदू मानून त्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले. सर्व समाज घटकाशी ऋणानुबंध जपले. आपला आम्हाला सार्थ अभिमान राहील. आपली सदैव आठवण येईल असे सांगितले. या प्रसंगी समारंभाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. विद्यार्थी मनोगत दिया वणवे श्रुती काळे यांनी व्यक्त केले. शिक्षक मनोगत पांडुरंग कुचेकर अलका दीक्षित हेमा ढवळे किरण सोरटे यांनी मांडले. सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले.समारंभाच्या यशस्वितेसाठी सर्व विभाग शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले
0 Comments