आ. अभिजीत पाटील यांच्याकडून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्घाटन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुंगत, पांढरेवाडी, देवडे या म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन कामाचा पंधरवडा याबाबत सुचना केल्या.
अभियान १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबपर्यंत प्रत्येक गावांमध्ये अनेक योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोचवाव्यात अशी भूमिका मांडली. लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा मिळते. "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" उपक्रमास आजपासून सुरुवात होत असून ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी4 नक्कीच फायदा होईल असे आमदार अभिजीत पाटील म्हणाले..
यावेळी पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, नॅशनल हायवेचे केशव घोडके यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी, पत्रकार बांधव, पदाधिकारी, जेष्ठ मान्यवर, तरूण सहकारी, माताभगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments