माढा लोकसभा मतदारसंघातील २१ गावांना मिळणार मोबाईल कनेक्टिव्हिटी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिराजदित्य शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत ग्रामीण भागात तातडीने मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री ज्योतीराजदित्य शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील १७ गावे आणि सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ४ गावे अशा एकूण २१ गावांचा डिजिटल भारत निधी (DBN) अंतर्गत 4G सॅच्युरेशन स्कीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व गावांना मोबाइल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाणार आहे.
या गावांचा समावेश : जिल्हा सोलापूर (१७ गावे):
अंजनडोह, विहाळ, मोरवड, काञज, कोंढरचिंचोली, मांजरगाव, घोटी, आवाटी, जातेगांव, आळजापूर, गौंडरे, हिवरे, निमगाव ह., कुंगाव, पाथर्डी, चिंचोली, गोरेवाडी
जिल्हा सातारा (४ गावे): संभुखेड, इंजबाव, खडकी, हवलदारवाडी
या निर्णयामुळे ग्रामीण भागात शिक्षण, व्यवसाय, आरोग्य व दैनंदिन संवादासाठी आवश्यक डिजिटल सुविधा उपलब्ध होणार आहेत. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री ज्योतीराजदित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.
0 Comments