Hot Posts

6/recent/ticker-posts

उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास नातेपुते पोलिसांनी केले जेरबंद

 उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास नातेपुते पोलिसांनी केले जेरबंद 




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उभ्या असलेल्या वाहनांचे टायर चोरी करणाऱ्या कडेगाव जिल्हा सांगली  जिल्ह्यातील  बुरान इलाही मुलाणी वय - ४० वर्ष या चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आटपाडी पोलीस ठाणे येथे यापूर्वी बुरान मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे तपासात समजले.नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आकाश तानाजी बोडरे रा. नातेपुते ता. माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर गाडी नंबर एम एच ११ सी एच ०५५१ या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह  किंमत ७५ हजार रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.यावरून नातेपुते पोलीस ठाणे येथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या  व नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक  गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय - ४० वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगांव जिल्हा सांगली येथे पकडण्यात आले. सदर आरोपीस याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली  त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर आरोपीस वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल दोन टायर डिस्कसह किंमत ७५ हजार रुपये व  त्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची झेन कार तसेच उभे वाहनाचे टायर काढण्यासाठी वापरलेली जॅक व नट बोल्ट काढण्या साठी वापरलेली मशीन अशी एकूण २ लाख ४ हजार किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक  प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज  संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील सहा. पोलीस फौजदार श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक दत्ता खरात ,सहा पोलीस  फौजदार सत्यवान पाटकुलकर, सुभाष गोरे पो.कॉ. सचिन चव्हाण, मनोज शिंदे, रंजीत मदने, नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी  यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय
पाठकुलकर हे करीत आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments