मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टर कशाला? येऊ द्या ना चालत! पूरबाधित तरुणीचा प्रचंड संताप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरलाही अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. धरणांचे पाणी सोडले गेल्याने लोकांची घरे आणि संसार पाण्याखाली गेले. अनेक लोक पाण्यामध्ये अडकून पडले असतानाही सरकारकडून वेळेवर मदत पोहोचली नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप असून सोलापुरातील एका तरुणीने तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
सोलापूरच्या पूरग्रस्त भागात पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस येणार म्हणून सर्व यंत्रणा आज कामाला लागल्या होत्या. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून येणार म्हणून सर्व व्यवस्था केली जात होती. त्यावरून लोकांमध्ये संताप होता. एका तरुणीने तो माध्यमांसमोर व्यक्त केला. मुख्यमंत्री येणार म्हणून आज जी व्यवस्था केली जातेय, यंत्रणा काम करतेय ती काल कुठे होती, असा सवाल तिने केला. काल चॉपर आले होते ते फक्त दोन लोकांना घेऊन गेले. जाताना वरून हात करत होते फक्त. बाकीच्यांचे काय? आज मुख्यमंत्री येताहेत म्हणून एवढी व्यवस्था केली जातेय, कशाला हवेय हेलिकॉप्टर, येऊ द्या ना चालत, अशी संतप्त प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. उन्हाळय़ात आम्हाला पाणी कमी पडतेय तेव्हा का सोडत नाही आणि आता पावसाळय़ात का पाणी सोडता? आमची घरे पाण्याखाली गेली, अशी व्यथाही एका तरुणाने मांडली.
0 Comments