गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी डिजिटल व्यासपीठाची निर्मिती
आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे परिवर्तनाची गती वाढली आहे. : संजीव बजाज
सोलापूर :(कटुसत्य वृत्त):-: “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्र सध्या आजार झाल्यानंतरच्या उपचारांवरून प्रतिबंधात्मक उपचारांकडे वळत आहे. आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे ही परिवर्तनाची गती वाढली आहे. सिरम इन्स्टिट्यूट सोबत आम्ही एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म उभारतो आहोत, जो लोकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करणार आहे असे मत ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी व्यक्त केले. ‘विदाल हेल्थ’ने आणि जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधासाठी एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला, ‘विदाल हेल्थकेअर सर्व्हिसेस लि.’च्या कार्यकारी संचालिका नीथा उत्तय्या यांच्यासह अधिकारी वर्ग व आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूरसह संपूर्ण भारतात दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून, ‘विदाल हेल्थ’चा डिजिटल प्लॅटफॉर्म हा पहिल्यांदाच एचपीव्ही लसीसाठी सर्वकष (एंड-टू-एंड), कागदपत्रविरहित, सोयीस्कर आणि कॅशलेस अनुभव देणारा असेल. यावर डॉक्टरची वेळ ठरवण्यापासून, संमतीपत्र भरणे आणि प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत सगळी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात असतील. यात औषधांच्या डोसच्या वेळेची आठवण, उपचारांचे पालन तसेच त्यातून सातत्यपूर्ण देखभाल करणे रुग्णांना शक्य होईल.
‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, तिचा प्रभाव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्धता व जनजागृती गरजेची आहे. विदाल हेल्थसोबतची भागीदारीच्या या माध्यमातून अत्यावश्यक लसी अधिक सहजपणे उपलब्ध करून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा आमचा उद्देश आहे.”
‘विदाल हेल्थकेअर सर्व्हिसेस लि.’च्या कार्यकारी संचालिका नीथा उत्तय्या म्हणाल्या, “सिरम इन्स्टिट्यूटशी आम्ही भागीदारी ही पारदर्शक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देण्यासोबतच, क्लेम प्रक्रिया व वेलनेस प्रोग्रॅम्स या विद्यमान सेवांमध्ये ही योजना भर घालते. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतात वाढत चाललेल्या हॉस्पिटलायझेशनचा व वैद्यकीय स्वरुपाचा खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ”
0 Comments