Hot Posts

6/recent/ticker-posts

पंडित दीनदयाळ यांनी समाजाला नवी देशा देण्याचे काम केले- परिचारक

 पंडित दीनदयाळ यांनी समाजाला नवी देशा देण्याचे काम केले- परिचारक



पंढरपूर शहर व तालुका भाजपाच्या वतीने उपाध्याय यांना अभिवादन 

 

पंढरपूर- भारतीय राजकारणात, आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानवतावाद आणि अंत्योदय सारख्या प्रगतीशील विचारांद्वारे समाजाला एक नवीन दिशा देण्याचे उत्तम काम केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.

अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान विचारवंत, संघटक आणि गरिबांच्या उन्नतीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे प्रेरणास्रोत, पंडित_दीनदयाळ_उपाध्यायजी यांच्या जयंती  निमित्त आज टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर येथे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना परिचारक यांनी, हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या रुपात सांगितला आहे. 

समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास आणि कल्याण पोहोचले तरच समाजाची खरी उन्नती शक्य आहे असे त्यांचे मत होते. त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आज भाजपचे सरकार काम करीत आहे असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, बाबासाहेब बडवे, प्रणव परिचारक, बादलसिंह ठाकुर, संदिप माने, माऊली हळणवर, दत्तसिंह रजपुत, अपर्णा तारखे, ज्योती जोशी, सुचिता सगर, धिरज म्हमाने, प्रशांत घोडके, सुवर्णा कुरणावळ, मिलिंद येळे, विजय भुसनर, आबा झेंड, संजय घाडगे, आबा पवार, विजय मोरे, सोमनाथ ढोणे, अजित खिलारे, प्रसाद कोळेकर, हणमंत शिंदे तसेच पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments