टेंभुर्णी परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभूर्णी शहर आणि परिसरात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घालून जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. टेंभुर्णी परिसरातील चव्हाणवाडी टें, वेणेगाव, बेंबळे, मिटकलवाडी, अकोले बुद्रुक, परिते, परितेवाडी, आहेरगाव, अकुंबे, भुइंजे, पैलवान, पिंपळनेर, सापडणे टें, तांबवे टें, लगोरी, शिराळ, आढेगाव, चांदज, भिमानगर रांजणी, उजनी टे, आलेगाव, रुई, गार अकोले, टाकळी, वडोली, अशा भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, मका, फळबागा डाळिंब, केळी,पेरू ,भाजीपाला , तसेच ऊस पिकांचे फड अक्षरशः भुईसपाट झाले आहेत. यामध्ये हजारो हेक्टरवरील फळबागांचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे तर शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरानगर सह परिसरातील जवळपास दोनशे घरामध्ये पावसाच्या पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे.या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी वाहत होते.या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतिपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी
शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट
सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे माढा तालुक्याबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुनाथ नुकसान झाले आहे तरी सरकारने तातडीने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावी
अमोल जगदाळे, प्रहार संघटना सोलापूर धाराशिव संपर्कप्रमुख*
*माढा तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांच्या फळबागा ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना मदत करावी
माजी राष्ट्रवादी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक- देशमुख*
0 Comments