जिजाऊ ज्ञान मंदिरच्या दोन विद्यार्थ्यांनी तलवारबाजी आणि योगासन स्पर्धेमध्ये घेतली गरुडभरारी
कोंडी,(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय योगासन स्पर्धा व तलवारबाजी स्पर्धा युवक संचालनालय पुणे विभाग यांच्या वतीने राजीव गांधी इंडस्ट्रियल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील आविष्कार प्रसेंजित काटे या विद्यार्थ्या ने 14 वर्ष वयोगटामधून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालीय.
तसेच तलवारबाजी(फाईल) या प्रकारात 19 वर्षीय मुलीच्या गटामध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील सबा एजाज शेख हिने फाईल या तलवारबाजी या प्रकारात गोल्ड मेडल पटकावून गरुड झेप घेतलीय .
जिजाऊ ज्ञान मंदिर मधील अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले.
त्यामुळे सर्वत्र जिजाऊ ज्ञान मंदिर मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
हे यश खेचून आणल्यामुळे दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते.
या निवडी बद्दल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्या सुषमा नीळ, प्रा. नवनाथ भोसले, प्रा वैभवी कुंभारी, दादासाहेब नीळ व क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments