राज्य साखर संघाच्या वार्षिक सभेत स्वरुपाराणी मोहिते पाटील यांची उपस्थिती
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची ६९ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.२५/०९/२०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील सदर सभेस उपस्थित होत्या.
सध्या राज्यात सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरु असून शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान झाले असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असा ठराव करून साखर संघाचे वतीने राज्य शासनास पाठवावा असा आयत्या वेळच्या विषयात ठराव मांडला.
सदर ठरावास साखर संघाचे अध्यक्ष पी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रतापराव ओव्हाळ, प्रकाश आवाडे, व्यवस्थापकीय संचालक,संजय खताळ,संचालक मंडळ व मान्यवरांनी मान्यता देवुन राज्य शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या ठराव करून पाठविणेस मान्यता दिली.
सदर सभेत सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, सभापती, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलुज, राज्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, कार्यकारी संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments