अल्प कालावधीत मामाश्री पतसंस्थेची प्रचंड मोठी वाढ- बाबाराजे देशमुख
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरात अनेक पतसंस्था निर्माण झाल्या पतसंस्था चालवणे अवघड आहे अत्यंत कमी कालावधीत मामाश्री पतसंस्थेमध्ये ठेवींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कर्ज वाटप करताना योग्य ती खबरदारी घेतल्याने पतसंस्थेचा एनपीए शून्य टक्के वर आहे संस्थेचे संचालक मंडळ चांगले असल्याने अल्प कालावधीत मामाश्री प्रथम संस्थेची प्रचंड मोठी वाढ झाली असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेसाठी माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आ.अँड. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, धुळदेव पतसंस्थेचे चेअरमन अँड. डी. एन. काळे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ ( अण्णा ) कवितके, समता परिवाराचे अँड .बी.वाय राऊत, मामाश्री पतसंस्थेचे चेअरमन तथा अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख ,नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, शिवप्रसाद को-ऑपरेटिव्हच्या चेअरमन ऋतुजा मोरे, लक्ष्मी कृष्ण पतसंस्थेचे चेअरमन माऊली पाटील हर हर महादेव पतसंस्थेचे चेअरमन वामन पलंगे, सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन रणवीर देशमुख, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष काळे तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. पतसंस्थेचे अहवाल वाचन रोहित झेंडे यांनी केले असून प्रास्ताविक संचालक अँड. रावसाहेब पांढरे यांनी केले तर आभार संचालक मोहित जाधव यांनी मानले.
चौकटीत :
पतसंस्था चालवायला कर्ज वसुली करून नफा वाटायला फार मोठी कसोटी लागते.नातेपुते शहरातील लोकांचे आर्थिक व्यवहार चांगले असल्याने पतसंस्थेचा टर्नवर मोठा आहे. पतसंस्थेत १३ कोटी ठेवी, १० कोटी कर्जवाटप ४ कोटी गुंतवणुक असुन पतसंस्थेचे ५३ लाख भाग भांडवल आहे. त्यामुळे मामाश्री पतसंस्थेची वेगाने वाटचाल सुरू आहे.
अँड माजी आ.रामहरी रूपनवर
0 Comments