लोकनेते माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न
अनगर (कटूसत्य वृत्त:- अनगर येथील माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली लोकनेते बाबूरावअण्णा पाटील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष गजानन जिरगे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
प्रथम लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला.नवनियुक्त मुख्याध्यापक वनवनियुक्त सभासदांचा यांचाही सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती, दहावी, बारावी,पदवीमध्ये विशेष यश मिळविलेल्या सभासदांच्या पाल्याचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सचिव शिवाजी थिटे यांनी अहवालाचे वाचन केले.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डाॅ. चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील,मुख्याध्यापक संजय डोंगरे, माजी मुख्याध्यापक राजेंद्र वाकळे,मुख्याध्यापक दिलिप लोहकरे, उपमुख्याध्यापक महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात,सोमनाथ ढोले, सुजित पासले,रंजना सरक,अनिता लांडगे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments