मुलांमधील जिज्ञासा संपत चालली आहे - ह. भ. प. देशमुख
अकलूज (कटूसत्य वृत्त):- आधुनिकतेच्या या काळात मुलांमधील जिज्ञासा संपत चालली आहे. विद्यार्थी दशेतील मुलांना सतत प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न शोध घेण्याला कारणीभूत असतात. आणि शोधानेच प्रगती होते असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते ह. भ. प. धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी केले.
वै. ह. भ. प. सुखदेव (आप्पा) शिंदे यांच्या 88 व्या जयंती निमित्त हनुमान हायस्कुल व ज्यु. कॉलेज, तांदुळवाडी, ता. माळशिरस येथे आयोजित भव्य राजस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ह. भ. प. धैर्यशीभाऊ देशमुख हे बोलत होते. यावेळी मिलिंद शिंदे, शिवाजी दुधाट, दत्तात्रय उघडे, विजय पवार, अभिमान मिले, शशिकांत कदम, ज्ञानेश्वर उघडे, बाळकृष्ण कारंडे, बापूसाहेब काकडे, सोपान काकडे, गजेंद्र मिले, मुख्याध्यापक मा. मा. देवकर, मुख्याध्यापिका अनिता कदम हे उपस्थित होते. जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. एक मूल एक रोप ही संकल्पना राबवत रोपांचे वाटपही करण्यात आले. दूर अंतरावरून येणाऱ्या मुलींसाठी सायकल बँकेची स्थापना करण्यात आली. परिसरातील दानशूर व्यक्तींनी या बँकेला 11 सायकल भेट दिल्या. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात विठ्ठल साळूंखे यांनी वै. ह. भ. प. सुखदेव आप्पा शिंदे यांचे कार्य आणी हनुमान हायस्कुलच्या प्रगतीचा आलेख मांडला.
वक्तृत्व स्पर्धेच्या इ. 1 ली ते 5 वी गटामध्ये इरीना पठाण, यशवंतनगर (प्रथम), आरोही दुधाट, तांदुळवाडी व सार्थक कुलकर्णी, सातारा (द्वितीय), गार्गी कडीले, वडूज (तृतीय), सदफ शेख, अकलूज व प्रणिती जाधवर, वडूज (चतुर्थ), नंदतनुज ढेकळे, डोकेवाडी (पाचवा). 5 वी ते 7 वी गटामध्ये संस्कृती बेहेरे, सांगोला (प्रथम), कुणाल संकुडे, सातारा (द्वितीय), जोतिरादित्य जाधव, लाखेवाडी (तृतीय), गाथा मिले, तांदुळवाडी (चतुर्थ), समृद्धी मगर, चांदापुरी (पाचवा)., 8 वी ते 10 वी गटात प्रणव जाधव, दुधोंडी (प्रथम), अनुष्का कुलकर्णी, सातारा (द्वितीय), मनराज कारंडे, श्रीपूर (तृतीय), शुभम आसबे, पंढरपूर (चतुर्थ), जेबा शिकलगार, माळशिरस (पाचवा)., महाविद्यालयीन खुल्या गटात संकेत पाटील, गडहिंग्लज (प्रथम), भारती मोटे, मेथवडे (द्वितीय), गौरी बोडरे, अकलूज (तृतीय), सानवी वालवेकर, सोलापूर (चतुर्थ), मोनाली पाटील, पंढरपूर (पाचवा) यांनी यश मिळवले. स्पर्धेचे हे 16 वे वर्ष आहे. परीक्षक म्हणून प्रा. उत्तम सावंत, डॉ. चंद्रकांत साळुंखे, प्रा. औदुंबर बुधावले, शशिकांत तेरखेडकर, समाधान काळे, संजय दुपडे, रमेश गायकवाड, विठ्ठल राजगुरू यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान हायस्कुल व कॉलेज च्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments