"बरसत्या धारा"
बहरून शिवार झोंबू लागला वारा,
कधी रिमझिम कधी बरसत्या धारा..
पीक फुलले ते फुलल्यात फळबागा,
हिरव्या शालू चा धरणी विनती धागा ..
कंठ अरवून पक्षी देई नभाला इशारा...
बहरून शिवार झोंबू लागला वारा..
कधी रिमझिम कधी बरसत्या धारा..
पांदी पांदीत पाणी गाव शहरात उसळे,
तृप्त सजीव वाहती नदी नाल्यातून तळे..
आभाळातुन होई गारांचा तो मारा..
बहरून शिवार झोंबू लागला वारा,
कधी रिमझिम कधी बरसत्या धारा..
चिंब झालेत मने झाली या चिंब धरती,
बिंजाडाला अंकुर फुटून आले कोंब वरती..
श्रावण गोंजारतो पाऊस सुखावतो गारा...
बहरून शिवार झोंबू लागला वारा,
कधी रिमझिम कधी बरसत्या धारा
रामप्रभू गुरुनाथ माने
सोलापूर.मो,9850236045
0 Comments