पावसाळ्यात रस्त्यावर तारा हाताने उचलण्याचा प्रयत्न करु नका- प्रा.डॉ.जयपाल पाटील
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- सध्या पावसाळ्याचा हंगाम जोरदार असुन सोबत वादळी वारे मुळे गावातील एम.ई.बी. च्या तारा पडतात त्याच्या शाॅक मुळे दुदैवी मृत्यु होतात. अश्या काही घटना आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात घडल्या आहेत. सध्याचा काळ सणावाराचा असल्याने विशेष करुन महिलांचे उपवास,देवी मंदिरात जाणेही व्रताचा भाग म्हणून पहाटे 4 ते 5वेळेस घरातून मंदिरात जाणे,अश्या वेळी एका हातात पुजेचे ताट आणी छत्री सहीत काळोखात जाताना,रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारा,अचानक आलेले साप,विंचु याकडे दुर्लक्ष होते आणी आपत्ती येते. यासाठी सोबत हातात विजेरी असावी,सोबतीला कोणातरी असावा. यासाठी महिलांनी काळजी घ्यावी असे मार्गदर्शन ग्रामपंचायत पेढांबे ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपत्तीव्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ.रसिका पाटील, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील, ग्रामसेवक शैलेश नाईक,कृषी सहाय्यक गजेंद्र पाटील,राजिप शाळा,केंद्र प्रमुख .दिलदार थळे,ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, रुपेश पाटील,माजी सरपंच रणजित पाटील,माजी सदस्य अँड.रत्नाकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी डॉ.जयपाल पाटील यांचा परिचय सदस्य रुपेश पाटील यांनी करून त्यांना सरपंच महोदयांनी स्वागत केले. प्रस्ताविकात शैलेश नाईक यांनी गावातील ग्रामस्थ, लहान मुले यांनी कोणतीच आपत्ती आली तर सामोरे कसे जायचे यासाठी आमचे जिल्हा परिषद च्या अध्यक्ष यांनी कार्यशाळेचे आयोजन करण्यास सांगितले,आहे त्याचा लाभ घ्यावा. यावेळेस शेतकरीवर्ग यानां भातशेती,आंबा बागायत, बिबियाणे यांच्या मुळे येणाऱ्या आपत्यांबाबत मार्गदर्शन कृषी सहाय्यक गजेंद्र पाटील यांनी दिली.यानंतर डॉ.जयपाल पाटील यांनी साप,विंचु दंश,अपघात, अडचणीचे बाळंतपणात बीव्हीजी ईडिंया लि.108 रुग्णवाहिकेचा वापर तसेच नेहमीच्या बाळंतपण साठी 102 आरोग्य खाते महाराष्ट्र शासन यांचेकडून 24 तास मोफत मदत मिळेल हे सांगुन धरातील गँस,ईलेट्रिकल, बाबत सुरक्षित कसे रहायचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.30 मिनिटात पेण येथून 108 पायलट सिध्दांत म्हात्रे डाॅक्टर अजित बर्गे येउन 108 ची माहीती उपस्थितां समोर दिली.तर प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथून 102 आरोग्य सहाय्यक गणेश गायकवाड वाहन चालक संदीप पाटील यांनी प्रास्ताविक दाखविले.कार्यक्रम यशस्वी करण्यास आशाताई सोनाली पाटणकर, अलिया कुरेशी,रेणुका आचरेकर, योगिता पाटील, अंगणवाडी सेविका सविता पाटील, नेत्रा पाटील, आणीग्रामपंचायत कर्मचारी अजित पाटील, श्रृती बैकर, सृष्टी पाटील यांनी मेहनत घेतली,शेवटी आभार जिपशाळा मुख्याध्या पिका सुलभा ठोंबरे यांनी मानले.
0 Comments