महासंघ जिल्हा संघटनेकडून प्रलंबित कमीशनचे कामे पुर्ण
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अखिल राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेकडुन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे मागील पेंडिंग कमीशन एक ते दीड वर्षापासुनचे व चालू नोव्हेंबर 2024 ते मे 2025 या महिन्या मध्ये कमीशन न मिळालेले धान्य दुकानदार यांचे कमीशन मिळावे या बाबत महासंघ जिल्हा संघटने कडुन निवेदन देण्यात आले.
यावेळी चर्चेदरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मागील एक ते दीड वर्षाखालील पेंडिग कमिशन हे रेगुलर कमिशन जमा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हे कमीशन जमा करण्यात येईल,चालू पेडीग कमीशन मधील नोव्हेंबर 2024 ते मे 2025 हे कमीशन सर्वा बरोबर जमा करण्यात येईल असे सांगीतले,तसेच महासंघ जिल्हा संघटनेकडुन या वेळी बसुन सर्व ग्रामीण जिल्हा मधील पेडीग धान्य दुकानदार यांचे रजिस्ट्रेशन कामे पुर्ण करुन घेतली.तसेच महासंघ जिल्हा संघटने कडुन जिल्हा पुरवठा अधिकारी व अव्वल कारकून मोईन डोणगावकर यांनी उशीर पर्यंत थांबून फक्त धान्य दुकानदार यांचा कामा साठी वेळ दिल्याबद्दल महासंघ जिल्हा कडून आभार मानण्यात आले.या वेळी उपस्थित महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, महासंघ जिल्हा संघटनेचे सहसचिव सोमनाथ पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष किरण दानोळे , तालुकाध्यक्ष गणेश बागल, पंढरपूर तालुक उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष महावीर वाकसे, मिलिंद रेडेकर तसेच ज्येष्ठ दुकानदार बंधू विठ्ठल महामुरे,नजीर भाई मुलाणी, जे एच नलवडे, शिरगिरे सर, किरण टकले,अरूण जाधव,अक्षय मुंडफणे व जिल्हा मधील महासंघ संघटनेचे धान्य दुकानदार उपस्थित होते.
0 Comments