शिवसेनेच्या ओबीसी जिल्हाप्रमुख पदी हिवरकर राजकुमार पाटील यांची निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेश जी बारसकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालय येथे जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून नातेपुते येथील राजकुमार लता शंकरराव हिवरकर पाटील यांची शिवसेनेच्या ओबीसी सोलापूर जिल्हा प्रमुख पदी निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.राजकुमार हिवरकर पाटील यांनी शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे ,आंदोलन साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिब रुग्णांवर केलेली सर्जरी, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेलं भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ५५ सायकलींचं मोफत झालेलं वाटप, सवलतीच्या दरात ९९ हजार माता-भगिनी ना केलेली डाळ वाटप, २७ गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली रेशन दुकान ३८ हजार महिलांचे आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोजन तपासणी तसेच मोफत उपचार शिबिरे ओबीसी साठी केलेलं महत्त्वपूर्ण संघटन याची दखल घेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी सोलापूर विभागाची जबाबदारी राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे दिली. मा.ना भरत शेठ गोगावले यांनी निवडीचे पत्र देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिलेल्या संधीचं सोनं करून ओबीसी विचारधारा शिवसेनेशी जोडण्याच निश्चित काम करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments