मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर
माढा (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त /सन्मानार्थ माढा तालुका भाजपाच्या वतीने महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
माढा शहरात ग्रामीण रुग्णालय माढा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १४५ वृद्ध नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. त्यापैकी २५ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भारत माता तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव सावंत, दादासाहेब साठे,उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे,
प्रकाश कुलकर्णी,शहाजी साठे,मुन्ना साठे,दिनेश जगदाळे,शिवाजी जगदाळे,अभिजीत साठे,यु एफ जानराव,भैया खरात, नाना साळुंखे, सज्जन जाधव,मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, रक्तदान शिबिराचे संयोजक प्रकाश कुलकर्णी, सरचिटणीस दत्तात्रय जाधव, मदन मुंगळे, शहाजी यादव, नंदकुमार मोरे, शंकर मुळूक, बिरुदेव शेळके, माया माने, नवनाथ जाधव, प्रताप पवार, नितीन शिंगाडे, बिरूदेव वाघमोडे, गणेश देशमुख, विशाल कदम, शहाजी भांगे, प्रमोद रोटे, लाला झाडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
0 Comments