Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्या निकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 विद्या निकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी



मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्या निकेतन प्रशालेत संस्थेचे अध्यक्ष जनार्दन बापू कादे व मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरुपौर्णिमा"अतिशय उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते शुगर अनगरचे माजी चेअरमन हनुमंत बप्पा पोटरे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे निवृत्त गणित शिक्षक मा. ब्रह्मचारी कोल्हाळ व ज्ञानेश्वर माळी हे उपस्थित होते.

    यावेळी प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरुजनांचे चरण पूजन करून पुष्पगुच्छ देऊन  व पेढा भरवून गुरुजनांचे आशीर्वाद घेतले. यावेळी कु.गौरी पांडुरंग भोसले, कु. वैभवी भानुदास सिरसट व चि. पृथ्वीराज संतोष लांबरुड यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या जीवनात शिक्षक हा ज्ञानाचा झरा आहे असे सांगत  शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. तर प्रशालेचे शिक्षक नागनाथ धुमाळ यांनी आपल्या मनोगतातून गुरूंचे महत्त्व प्रतिपादन करून प्रत्येकाने आपल्या जीवनात  कोणालातरी आपले गुरु बनवावे असे सांगितले. याप्रसंगी शिवानंद बोधले,
रविकांत साबळे सौ.कांचन पवार, गजानन पाटील,सौ. अंजना सिरसट, संतोष वाघमोडे, प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments