Hot Posts

6/recent/ticker-posts

पु.ना. गाडगीळ अँड सन्सतर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप

 पु.ना. गाडगीळ अँड सन्सतर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. चांगला अभ्यास करून यश मिळवावे. आई- वडील आणि देशाचे नाव लौकिक करावे असे आवाहन करताना श्रमिक पत्रकार संघाने  पत्रकारांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमासाठी नेहमीच सहकार्य राहील,अशी ग्वाही पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे सोलापूर शाखा व्यवस्थापक कुलदीपसिंह राजपूत यांनी दिली.
      पु.ना. गाडगीळ अँड सन्सच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप समारंभ सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सभागृहात सोमवारी दुपारी पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक हेमंतकुमार साई, सुपरवायझर अन्वीर किणगी, तेजस शहा, प्रशांत देशमुख, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
        व्यवस्थापक हेमंतकुमार साई म्हणाले, 
 पु.ना. गाडगीळ अँड सन्सच्या वतीने विविध उपक्रमांना सहकार्य केले जाते.पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार नेहमीच समाजाचे विविध प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी धडपडत असतो. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात. पत्रकारांच्या विविध उपक्रमासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. 
     श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक कले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार आणि पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----

Reactions

Post a Comment

0 Comments