सरकार दलालीच्या दलदलीत धसलय? लाडकी बहिण योजनेलाही सुट्टी नाही
रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेवर गेल्या काही दिवसापासून कात्री लावली जात आहे. जून महिन्यात तब्बत 26 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या होत्या.
तर आतापर्यंत 40 लाख 28 हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. एकीकडे अपात्रतेची कारवाई सुरू असनाच यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होताना दिसत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी लाडकी बहिण योजनेत देखील आता भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन रोहित पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकार या योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असून यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सरकारचा एक जीआर ट्वीट करत सरकारवर निशाना साधला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये महायुतीचे सरकार दलालीच्या दलदलीत धसलं आहे. हे सरकार भ्रष्टाचाराने इतकं पोखरलं गेलंय की गोर गरीब महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजनेला सुद्धा सुट्टी दिलेली नाही. या योजनेतही कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. यातही मोठ्या प्रमाणात अपहार सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला. पण सरकारच्या निर्णयानुसार ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते. पण तसे झालेले नाही. या विभागाला डावलून महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी खर्चाचा जीआर काढला गेला. 3 कोटींची मान्यता देण्यात आली.
तर ज्या कंपन्यांना हे प्रसिद्धीचे काम देण्यात आले त्या कोणाच्या? कोणत्या आणि कोणाशी संबंधित आहेत? याची माहिती माहिती अधिकारात मागवली असता त्यात विभाग काहीतरी लपवत असल्याचा वास येत आहे. त्यामुळे आता ज्या कंपन्यांना हे काम दिलं गेलं त्या बोगस कंपन्या आहेत का? याचा खुलासा सरकारने करावा अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तर हा आरोप असाच करत नसून त्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
0 Comments