Hot Posts

6/recent/ticker-posts

माढेश्वरी अर्बन बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माढा येथे होणार

माढेश्वरी अर्बन बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माढा येथे होणार



 

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा येथील माढेश्वरी अर्बन को.ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांच्या अध्यक्षतेखाली माढा येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न होणार आहे.या सभेला सर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार व हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले आहे.

सध्या माढेश्वरी बँकेच्या माढा, टेंभुर्णी,पंढरपूर, लोणी-काळभोर,करकंब, कुर्डूवाडी,सोलापूर,करमाळा व मोडनिंब येथे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने व सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून 9 शाखा सुरू आहेत.सध्या बँकेचे 10704 सभासद आहेत.बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे.सर्वांच्या सहकार्याने सध्या बँकेत 216 कोटी 78 लाख ठेवी आहेत. मागील सलग चार वर्षांपासून बँकेचा एनपीए शून्य (0) टक्के राखण्यात यश मिळाले आहे. बँकेने एकत्रितपणे 333 कोटींची आर्थिक उलाढाल केली आहे.बँकेच्या वतीने आर्थिक व्यवहाराबरोबरच विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी निवासाची, भोजनाची व चहा-पाण्याची व्यवस्था आदी सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात.बँकेकडून सभासद, खातेदार,ठेवीदार व कर्जदारांना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सर्व अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

बँकेच्या सर्व सभासद व खातेदारांनी आधारकार्ड,पॅन कार्ड,फोटो व मोबाईल नंबर देऊन केवायसीची (KYC) पूर्तता करून घ्यावी. ज्या सभासद व खातेदारांनी वारसाची नोंद केली नाही त्यांनी नोंद करून घ्यावी असे आवाहन बँकेचे सरव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम व वसुली अधिकारी राजकुमार भोळे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments