बालाजी अमाईन्सच्या मदतीने शिरापूर येथील स्मशानभूमीचा प्रश्न लागला मार्गी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील हिंदू स्मशानभूमीच्या दहन शेड साठी बालाजी अमाईन्स सीएसआर फंडामधून आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे शिरापूर गावच्या नवीन स्मशानभूमी बांधण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, बसवराज आंटद, ठेकेदार अमोल कारंडे, पत्रकार महेश पांढरे, ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर,सरपंच वृषाली सावंत, उपसरपंच सौदागर साठे, ग्रामपंचायत सदस्य विजया ताकमोगे, रेणुका बंडगर, सागर काळे, आप्पासाहेब कोळेकर, फंटू कोळेकर, बाळासाहेब हारदाडे, बाळासाहेब धोत्रे, हरिदास थिटे, विश्वनाथ सावंत, गजानन कुंभार, राहुल सर्वगोड, आदिसह शिरापूर ग्रामस्थ उपस्थित होते.
बालाजी अमाईन्सच्या सीएसआर फंडामधून शिरापूर गावामध्ये अत्याधुनिक अशी स्मशानभूमीची इमारत बांधण्यात येणार असून लगत टॉयलेट व बाथरूम पत्रा शेड नागरिकांना बसण्याकरिता पायऱ्या परिसरामध्ये फेवर ब्लॉक हात पाय धुण्यासाठी पाण्याच्या नळाची व्यवस्था आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती दत्तप्रसाद सांजेकर यांनी दिली.
काम सुरू केल्यानंतर ते काम सरासरी चार महिन्यांमध्ये पूर्ण करून देण्यात येणार असल्याचे ठेकेदार अमोल कारंडे यांनी सांगितले.
चौकट
शिरापूर ग्रामस्थांनी मांनले डी. राम रेड्डी यांचे आभार.
शिरापूर गावामध्ये असलेली स्मशानभूमीची इमारत ही जीर्ण होत आलेली होती. नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी याकरिता शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांना विनंती करण्यात आली होती .सदर विनंतीस मान देऊन डी.राम रेड्डी यांनी शिरापूर गावाच्या स्मशानभूमीकरता बालाजी अमाईन्सच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
0 Comments