तालुक्यातील गावांचा चेहरामोहरा बदलणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 25, 2025

तालुक्यातील गावांचा चेहरामोहरा बदलणार

 तालुक्यातील गावांचा चेहरामोहरा बदलणार

हंजगी (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळात जास्तीत जास्त विकास निधी आणून तालुक्यातील गावांचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी आश्वासन दिले.


अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ ते कोर्सेगाव रस्त्याचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजनप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बोलत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कलकर्जाळ ते कोर्सेगाव रस्ता मंजूर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील ग्रामस्थांची पक्क्या रस्त्यांची मागणी होती. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या सहकार्याने सदर रस्ता लवकरच पूर्णत्वास येईल आणि गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावेल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages