महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 24, 2025

महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा

 महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा


मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. पण महाराष्ट्राला येत्या काही दिवसांत चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते पुढील 36 तासांत हे क्षेत्र तीव्र होऊन चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते. सध्या चक्रीवादळाचा धोका नाही. या चक्रीवादळामुळे 40-60 किमी/तास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात 'शक्ती' नावाचे संभाव्य चक्रीवादळ सक्रिय आहे. हे चक्रीवादळ २३ ते २८ मे दरम्यान प्रभावी होऊ शकते. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी आहे. पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

रायगड, मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांत हवामानाचा इशारा

रायगड, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि आवश्यक खबरदारी बाळगावी.

नागरिकांना आवाहन

हवामान खात्याने नागरिकांना पुढील काही तासांत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये, तसेच विजेच्या खांबांपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सुचवले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतासाठी तयार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages