Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागात आजही रंगताहेत विटी-दांडू, लगोरी अन गोट्याचे डाव

 ग्रामीण भागात आजही रंगताहेत विटी-दांडू, लगोरी अन गोट्याचे डाव 



मुबंई (कटूसत्य वृत्त):- शाळांना सुट्टी लागल्यामुळे अनेक गावांमधील तरुणाई वेगवेगळ्या खेळांमध्ये रमू लागली आहे. त्यामध्ये विटी- दांडू, गोट्या,लगोरी, सूर, सपाटी या पारंपरीक खेळांची आवड कायम आहेत. आजच्या युगात मोबाईल वरील ऑनलाईन गेमिंगच्या विश्वातही जगतामध्ये या खेळांनी ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हे सर्व खेळण्यात मुले रममाण झाल्यामुळे घरासमोरील अंगणात, मोकळ्या जागांवर यांचे डाव रंगलेले पाहायला मिळत आहेत.
    दहा ते पंधरा वर्षापूर्वी शाळेला सुट्टी पडल्यावर मुले गल्ली, अंगणात गोट्यांचा खेळ खेळत असत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला हा परिसर पोरांनी - सोरांनी अंगण फुलवून जात होता. मात्र काही वर्षांपासून हा काळबाह्य होण्याच्या मार्गांवर होता. मोबाईल मध्ये वेगवेगळे खेळ असल्याने अनेक मुले सुट्टीमध्ये मोबाईलवरच पब्जी, फ्रिफायर खेळ खेळण्यात मग्न होते. त्यामुळे गल्ली व अंगणातील मुलांचा किलबिलाट नाहीसा होऊ लागला होता. परंतु पारंपरिक आणि मैदानी खेळांना पुन्हा नवसंजीवनी मिळण्याचे चित्र आहे.

चौकट:- 
क्रिकेटसह आयपीएलचाही तरुणाई मध्ये फिव्हर 

सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी काही मुले खेळ खेळत आहेत, तर काही मुले आयपीएल क्रिकेट स्पर्धा बघण्यात मग्न आहे. पण राज्यातील काही मुले पारंपरिक
खेळ खेळत असल्याचे दिसून आले आहे.

दोन गट निर्माण करून गोट्या खेळण्याचा खेळ ठीकठिकाणी खेळत असल्याचे पहावास मिळत आहे. हा खेळ पुन्हा बहरण्याच्या मार्गावर आहे.

कोट :- 
गोट्या हा पारंपरिक खेळ आहे. पूर्वी प्रत्येक खेड्या - पाड्यात आणि गावा - गावात हा खेळ आवडीने खेळला जात होता.मात्र मोबाइलमुळे याकडे दुर्लक्ष झाले होते, पूर्वीसारखे हा खेळ सुट्टीत खेळला जात आहे. एकाग्रता निर्माण करण्याबरोबर एकत्र राहण्याची शिकवण यातून मिळत आहे.

संजय जाधव, (पालक)
Reactions

Post a Comment

0 Comments