Hot Posts

6/recent/ticker-posts

जरांगे पाटील नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठासोबत ॲड. श्रीरंग लाळे यांची चर्चा !

 जरांगे पाटील नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठासोबत ॲड. श्रीरंग लाळे यांची चर्चा !




जालना (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बेधडकपणे बाजू मांडणाऱ्या तसेच गरजवंत आणि वंचित मराठा समाजाला कुणबी आरक्षणाच्या माध्यमातून नव संजीवनी देणाऱ्या आणि तोच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील गरजवंतांच्या आरक्षणाचा प्रश्न लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

 संत तुकाराम यांची विद्रोही 'भक्ती' आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची 'शक्ती' अशा 'भक्ती- शक्ती' संगमांच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आतडे तुटेपर्यंत प्रामाणिकपणे संघर्ष करणारी काही मोजकी माणसे राहिली आहेत त्यापैकी मनोज जरांगे पाटील हे एक आहेत !

आगामी काळामध्ये वैचारिक संघटनाच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची सुसंस्कृत पुरोगामी ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू राहील; असा मला विश्वास वाटतो. यावेळी प्रामाणिक नेतृत्व माऊली पवार तसेच कणखर सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद पाटील आणि प्रा. संभाजी चव्हाण  आणि ॲड. श्रीरंग लाळे  उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments