मंगळवेढ्यात शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- उजनी लाभक्षेत्रात टेल एंडला असलेल्या भागातील उन्हाळी हंगामातील पाण्याची पाळी पुरेशा दाबाने न सोडल्यामुळे पिके जळून चालली असून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पंढरपूर विजापूर या महामार्गावर मरवडे येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
उजनी पाणी वाटपाचे तालुक्यातील नियोजन अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे विस्कळीत झाले असून तालुक्यातील काही भागातील शेतीला पाणीच मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी पिके ऐन उन्हाळ्यात जळून चालली. परंतु अधिकाऱ्याची पाणी सोडण्याची मानसिकता होत नाही गेल्या काही दिवसापूर्वी मारापुर येथील उजनी वितरिका क्रमांक 37 ला पाणी सोडले नाही म्हणून शेतकऱ्यांची ओरड ताजी असतानाच नंदुर,मरवडे,डोणज,कागष्ट, कात्राळ, हुलजंती, डिकसळ या भागातील ऊस शेतीला उन्हाळ्यातील दुसरी पाळी सोडण्यात आली नाही.
याबाबत शेतकऱ्यांना अधिकार्यांना विचारण्यात केल्या असता अधिकाऱ्याकडून उजनी धरणात पाणी नसल्याचे कारण सांगत या शेतकऱ्यांना पाणी देण्यास चालढकल केली आहे. तर काही भागात सोडलेले पाणी पुरेशा दाबाने देखील नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात असलेली उभी जळून चालली आहे. या भागातील शेतकय्राच्या पिकाचे वार्षिक नियोजन चुकणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला हाताशपणामुळे उभी पिके बघताना मानसिकता होत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या भावना संतप्त होत मरवडे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.पाणी सोडण्याच्या बाबतीत टेल टू हेड नियमाचे पालन करता अधिकाय्रांनी मनमानी प्रमाणे चार दिवस पाणी सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी निवेदन दिले.यावेळी अॅड नंदकुमार पवार,अॅड राहूल घुले.माणिक पवार, दत्तात्रय मासाळ अशोक पवार,दादा काकेकर, धन्यकुमार पाटील,सुदर्शन घुले, संतोष पवार ,मेजर राहुल शिंदे, यांच्यासह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ऐनवेळी केलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे गेल्या तीन तासापासून महामार्गावरून वाहतूक विस्कळीत झाली. उजनीचे अधिकारी व शेतकरी यांच्या अद्याप तोडगा निघाला नाही पोलीस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
0 Comments