नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये इंग्रजी दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये जागतिक इंग्रजी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाट्न शाळेच्या मार्गदर्शिका मीनाताई पारखे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,प्राचार्या रुपाली हजारे,इंग्रजी विभाग प्रमुख तुलसी चितारी,इमरान सय्यद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमध्ये विविध पोस्टर निर्मिती केली होती याचे प्रदर्शन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा आपल्यासाठी कशी महत्वाचे आहे हे आपल्या भाषणामधून सांगितले.
कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या मार्गदर्शिका मीनाताई पारखे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची भाषा आहे.त्यामुळे सर्वांनी आपल्या रोजच्या संवादात या भाषेचा वापर केला पाहिजे असे सांगितले. संस्थेचे प्रमुख डॉ. कुमार दादा करजगी व संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते यांनी इंग्रजी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या विद्यार्थीनी स्नेहल डोके व उत्कर्षा जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख आनंद लिगाडे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्राचार्या
0 Comments